समाजवास्तव आणि तात्कालिक निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे करावे लागलेले विश्लेषण या पुस्तकात मांडण्यात आले आहे. लेखिकेने अनुभवलेल्या समाजाचे दर्शन यातून झाले आहे. पुस्तकातील विषय हे त्या त्या वेळी आलेल्या विषयांवर आधारित असल्याने, त्या त्या परिसरात जाऊन प्रचलित आणि अप्रचलित स्थितींचा अभ्यास करून प्रत्येक विषय मांडण्याचा प्रयत्न लेखिकेने केला आहे.