स्वातंत्र्याच्या 75री निमित्ताने 75 अपरिचित महिला स्वातंत्र्यसेनानींची गाथा…
या 75 विरांगनांमध्ये केवळ स्वातंत्र्यसमराच्या काळातील महिला नसून त्याही आधीपासून इंग्रजांशी लढा देत असलेल्या महिला वीरांगना आहेत. यात पहिला मानवी बाँब आणि पहिली सशस्त्र महिला तुकडी बनविणार्या राणी वेलू नाचियार, राणी चेन्नमा, राणी शिरोमणी, देवी अहिल्याबाई होळकर अशा वीरांगनांचा समावेश आहे. तसेच मूलमती, अम्मी स्वामीनाथन, उदा देवी, अवंतीबाई गोखले, राजकुमारी गुप्ता, बेगम हजरत महल, मीरा बहन, पेरिबेन कॅप्टन, फुलो-झानो मुर्मू, अजीजन बाई अशा अपरिचित वीरांगनांचीही माहिती देण्यात आली आहे.
स्वातंत्र्याची 75री साजरी करीत असताना अशा वीरांगनांचे स्मरण करणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.
२५०/-