Look Inside
Sale!

यमगरवाडीची गोष्ट

यमगरवाडी… भटके-विमुक्त समजाच्या उत्थानाचे स्वप्न या भूमीत पाहिले गेले. भटके-विमुक्तांची विशेषत: पारध्यांची मुलं प्रकल्पात आली आणि प्रकल्प सुरू झाला, असे रूढार्थाने म्हटले तरी वास्तव तसे नाही, कारण पालातून प्रकल्पात आलेली मुलं टिकून राहणे आणि त्यांच्या शिक्षणाची व्यवस्था करणे यासाठी प्रयत्न करावे लागणार होते.

170.00

Share this product!

गाव मात्र या पोरांकडे संशयाच्या नजरेने पाहत होता. मुळात पारध्यांचा प्रकल्प आपल्या गावाच्या हद्दीत होऊ नये, हीच त्यांची इच्छा. मग ती खदखद पारध्यांच्या  पोरांवर निघे. कधी पाणउतारा होई, तर कधी शिव्याशाप. अशातच 15 ऑगस्ट देशाचा स्वातंत्र्य दिन दिमाखात साजरा करावा आणि आपणही त्यात सहभागी व्हावे हे भाग्य भटके- विमुक्त समाजाच्या नशिबी नव्हतंच. प्रकल्पातील पोरं शाळेत गेली आणि झेंडावंदन केले आणि परत प्रकल्पात यायला निघाली… तेवढ्यात गावकरी पुढे आले आणि त्यांनी पोरांना धरले आणि सरासर चाबकाचे फटके पडू लागले. काय होते हे कळण्याआधीच पोरांची पाठ लालीलाल झाली. चारी बाजूंनी गावकऱ्यांनी घेरलेल्या पोरांना काय करावे, स्वत:चे रक्षण कसे करावे हेच कळेना. ते ओरडत होते, रडत होते; पण चाबूक थांबत नव्हते…
अशा अनेक हृदयद्रावक कहाण्या यमगवाडीची भूमी स्वत: सांगत आहे… रवींद्र गोळे लिखित यमगवाडीची गोष्ट या पुस्तकातून…

मूळ किंमत: 200/- रु.

सवलत मूल्य : 170/- रु.

Binding

Paperback

भाषा

मराठी

पृष्ठसंख्या

200

वर्ष

2020

Author

रवींद्र गोळे

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “यमगरवाडीची गोष्ट”

Your email address will not be published. Required fields are marked *