Look Inside
Sale!

ब्रिटिश संविधान उद्गम आणि विकास

Reviews (0)

लोकशाहीसारख्या आधुनिक संविधानात्मक मूल्यांची परंपरा आणि संसदेचे ‘मॉडेल’ इंग्लंडपासून सुरू आणि विकसित होते. ब्रिटिश संविधान संहिताबद्ध नाही, कारण क्रमाक्रमाने त्याचा विकास झाला आहे. परंपरा, करार आणि कायदा ह्याचा एकत्रित परिणाम म्हणजे ब्रिटिश संविधान. राजाकडून मिळवलेले हक्क, न्यायसंस्थेने दिलेले निर्णय हे संविधानाचा एक प्रकारे लिखित भाग आहेत.

225.00

Share this product!

लोकशाहीसारख्या आधुनिक संविधानात्मक मूल्यांची परंपरा आणि संसदेचे ‘मॉडेल’ इंग्लंडपासून सुरू आणि विकसित होते. ब्रिटिश संविधान संहिताबद्ध नाही, कारण क्रमाक्रमाने त्याचा विकास झाला आहे. परंपरा, करार आणि कायदा ह्याचा एकत्रित परिणाम म्हणजे ब्रिटिश संविधान. राजाकडून मिळवलेले हक्क, न्यायसंस्थेने दिलेले निर्णय हे संविधानाचा एक प्रकारे लिखित भाग आहेत. सध्या ग्रेट ब्रिटन हा चार राष्ट्रांचा समूह असला, तरी त्यांचा प्रत्येकाचा इतिहास स्वतंत्र आहे. पहिल्या शतकामध्ये रोमन लोकांनी ब्रिटनवर ताबा मिळवून लंडन शहराची उभारणी केल्यापासूनचा इतिहास पुस्तकात येऊन जातो. सुमारे साडेचारशे वर्षे रोमन साम्राज्याच्या आधिपत्याखाली राहिल्यानंतर रोमन सम्राट कॉन्स्टंटाइन ख्रिश्चन झाला. हा ख्रिस्ती धर्म रोमन लोकांनी ब्रिटनमध्ये आणला. हे सर्व अशासाठी महत्त्वाचे आहे की त्यानंतर ‘धर्म’, ‘चर्च’ आणि ‘पोप’ ह्या गोष्टींवरून पुढची हजार दीड हजार वर्षे प्रचंड घडामोडी होणार होत्या. कॉन्स्टंटाइनच्याच काळात रोममध्ये चर्च ही संस्था उदयास आली, ती शक्तिमान होत गेली, तिच्याकडे प्रचंड अधिकार आणि सत्ता असणारी पोपशाही सुरू झाली. हीच पुढे जाऊन ब्रिटनमध्ये मोठे धर्मयुद्ध होण्यास आणि युरोपभर ‘सेक्युलॅरिझम’ तत्त्वाचा उदय होण्यास कारणीभूत ठरली.

लेखक – रमेश पतंगे

प्रकाशक – हिंदुस्थान प्रकाशन संस्था