Look Inside

जागतिक सत्तासंघर्ष आणि भारत

Reviews (0)

‘जागतिक सत्तासंघर्ष आणि भारत’ हे ज्येष्ठ विचारवंत, लेखक रमेश पतंगे लिखित पुस्तक आहे. जागतिक सत्तासंघर्षात आर्य चाणक्य यांची परराष्ट्र नीती ते आजचे पंतप्रधान मोदी यांची (आणि माजी सर्व पंतप्रधानांची) परराष्ट्र नीती व्हाया स्वामी विवेकानंद/म. गांधी यांचे नेमके स्थान काय किंवा काय भूमिका राहिली, याचा या पुस्तकात थोडक्यात वेध घेण्याचा प्रयत्न केला आहे…..
किमत फक्त २२५ /- रु. 

माझ्या रोजच्या जगण्यात, व्यवहारात जागतिक सत्ता संघर्षाचा काय संबंध?

नेमका हाच गैरसमज दूर करणारं अगदी सध्या सोप्या भाषेत आपलं जगणं जागतिक घडामोडीच्या पार्श्वभूमीवर समजून घ्यायला मदत करणारं आणि आपली दृष्टी व्यापक करणारं पुस्तक.

जागतिक सत्तासंघर्ष आणि भारत
लेखक – रमेश पतंगे

राष्ट्रीय विचारधारेची कास धरणाऱ्या प्रत्येक नागरिकासाठी…

मूळ किंमत 250/- ₹
सवलत मूल्य 225/- ₹

‘जागतिक सत्तासंघर्ष आणि भारत’ हे ज्येष्ठ विचारवंत, लेखक रमेश पतंगे लिखित पुस्तक आहे. जागतिक सत्तासंघर्षात आर्य चाणक्य यांची परराष्ट्र नीती ते आजचे पंतप्रधान मोदी यांची (आणि माजी सर्व पंतप्रधानांची) परराष्ट्र नीती व्हाया स्वामी विवेकानंद/म. गांधी यांचे नेमके स्थान काय किंवा काय भूमिका राहिली, याचा या पुस्तकात थोडक्यात वेध घेण्याचा प्रयत्न केला आहे…..

2014 साली भारतात सत्तांतर झाले.  2014 साली मोदी पंतप्रधान झाले आणि रालोआ म्हणून निवडणूक लढवली गेली, तरी भाजपा या पक्षाला पूर्ण बहुमत मिळाले. 2019 साली त्याचीच पुनरावृत्ती झाल्यामुळे घटक पक्षांचे दबावाचे राजकारण कमी झाले, प्रांतिक अस्मितेच्या गोष्टी तुलनेने मागे पडल्या.. किंबहुना त्या अस्मितेच्या नावावर सरकारला अडचणीत आणण्याचे प्रकार कमी झाले.

आपल्या शपथविधीला सार्क देशांच्या प्रमुखांना निमंत्रित करून मोदींनी आपली चुणूक दाखवली असली, तरी परराष्ट्रविषयक आव्हाने कमी झाली नव्हतीच, पण सत्तासंघर्षात चीनसारखा देश सामील झाला होता, तंत्रज्ञान अधिक प्रगत झाले होते, पर्यावरणीय समस्या गंभीर होत चालल्या आहेत, इस्लामी दहशतवादाची छाया सर्व जगावर अधिक गडद होत चालली आहे. काश्मीर प्रश्न आणि 370 व 35 अ कलम रद्द करणे, पाकचा लष्करसमर्थित दहशतवाद आणि सर्जिकल स्ट्राइक त्यामुळे भारताची बदललेली प्रतिमा जगाच्या लक्षात आली.