चरित्र
‘परिसांचा संग’
ज्येष्ठ संघ स्वयंसेवक, सामाजिक कार्यकर्ते आणि समरसता पुनरुत्थान गुरुकुलाचे संस्थापक पद्मश्री गिरीश प्रभुणे यांच्या ‘परिसांचा संग’ या पुस्तकातून लौकिकाला अलौकिक करणार्या ध्यासवेड्यांची व्यक्तिचित्रणे रेखाटली आहेत. या व्यक्तिचित्रणांच्या माध्यमातून सामाजिक परिवर्तनाची दिशा स्पष्ट करण्याचा हा पहिलाच प्रयत्न असावा. साहित्यिक भाषेत संघ कार्यकर्त्याचा परिचय करून देणारे हे पहिलेच पुस्तक असेल.
पुस्तकाची किंमत ३००/- रुपये असली तरी यातील ५०/- रुपये गिरीश प्रभुणे यांचे जीवनकार्य असणाऱ्या ‘पुनरुत्थान समरसता गुरुकुलम’ संस्थेला देणगी रूपाने दिले जातील.
अटलजी जीवन पैलू
भाजपच्या आजच्या पिढीतील नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी ही पुस्तिका नक्की वाचली पाहिजे. राजकीय जीवनात, सार्वजनिक आयुष्यात कसे वागावे, काय बोलावे, काय बोलू नये याचा वस्तुपाठ अटलजींचे जीवन देते.
अटलजी जाणून घेण्यासाठी आजच आपली प्रत नोंदवा.
पृष्ठसंख्या – 36
कर्तव्यभूमीचे पुजारी ( पाच पुस्तकांचा संच )
कर्तव्यभूमीचे पुजारी ( पाच पुस्तकांचा संच )
फक्त २५०/- रुपयांत
* मा. रवींद्र पवार, कोकण प्रांत – अभाविपचे कार्यकर्ता ते कोकण प्रांत सहकार्यवाह अशा चढत्या भाजणीमध्ये जबाबदारी घेऊन संघकामाचा सामाजिक आशय प्रकट करणारे कार्यकर्ते म्हणजे रवींद्र तुकाराम पवार होय.
* मा. मोहनराव गवंडी, प. महाराष्ट्र प्रांत – भारतीय मजदूर संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते. विधान परिषदेचे आमदार. सामाजिक समरसता मंचाचे संस्थापक म्हणून मोहनराव गवंडी यांनी दीर्घकाळ काम केले आहे.
* गोविंदराव (नाना) आहेर, प. महाराष्ट्र प्रांत – नाशिक जिल्ह्यातील ग्रमीण भागात संघकामाची व्याप्ती वाढवून स्वयंसेवकांना कायम आपुलकी, प्रेमाची अनुभूती देणारे जिल्हा संघचालक म्हणून गोविंदराव (नाना) आहेर यांनी काम केले.
* भाऊसाहेब जहागीरदार, देवगिरी प्रांत – ज्येष्ठ संघकार्यकर्ते. विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून हिंदुत्त्वाचा विषय सर्वदूर घेऊन जाणारे कार्यकर्ते म्हणजे भाऊसाहेब जहागीरदार होय.
* बापूसाहेब लाखणीकर, विदर्भ प्रांत – विदर्भातील पहिल्या पिढीचे संघ स्वयंसेवक. शिक्षण क्षेत्रात संस्थात्मक बांधणी करुन राष्ट्रीय विचारांची जपवणूक करणारे कार्यकर्ते म्हणजे बापूसाहेब लाखणीकर होय.
दि गेम चेंजर : नरेंद्र मोदी
2024ची निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून पद्मश्री रमेश पतंगे लिखित ‘दि गेम चेंजर : नरेंद्र मोदी’
भारतात झालेले परिवर्तन समजून घेण्यासाठी, कोणता खेळ मोदींनी बदलला, हे समजून घेण्यासाठी आणि कार्यकर्त्यांना विषय मांडणीसाठी हे पुस्तक उपयुक्त आहे.