Popular

Sale!

 राम मंदिर ते राष्ट्र मंदिर

राम मंदिरातून उभे राहणारे आपले राष्ट्र मंदिर म्हणजे ‘रामराज्य’ उभे करण्याचा आपला संकल्प कसा असेल, हे या पुस्तकातून उलगडणार आहे.

हेच पुस्तक का वाचावे?
कारण यात पाच शतकांच्या संघर्षाच्या इतिहासापासून आत्मनिर्भर भारत कसा उदयाला येईल याविषयीच्या विविध लेखांचा समावेश आहे. विवेकानंदांच्या संकल्पनेतील भारतपासून आत्मनिर्भर भारताचा मोदी मार्ग दाखविण्यात आला आहे. तर आपल्या प्रत्येकाच्या स्वप्नातील भारत कसा असेल, शास्त्रसज्ज भारत कसा असेल, नव्या जगाचे शिक्षण, नव्या युगाचे राजकारण, समाजहिताचे तंत्रज्ञान, भविष्यातील भारतीय समाज कसा असेल याचे अभ्यासपूर्ण विवेचन तज्ज्ञांकडून करण्यात आले आहे.

संपादक : रवींद्र गोळे

499.00
Sale!

‘अखंड भारत का आणि कसा?

पुन्हा अखंड भारत कसा निर्माण होईल?

त्याची संकल्पना काय?

अतिशय महत्त्वाचा आणि आपल्या विचारधारेचा हा विषय समजून घेण्यासाठी ‘अखंड भारत का आणि कसा? पुस्तकाची प्रत आजच नोंदवा.

पुस्तकाची मूळ किंमत – रु. 250/-
सवलत मूल्य – रु. 225/-

225.00

‘परिसांचा संग’

ज्येष्ठ संघ स्वयंसेवक, सामाजिक कार्यकर्ते आणि समरसता पुनरुत्थान गुरुकुलाचे संस्थापक पद्मश्री गिरीश प्रभुणे यांच्या ‘परिसांचा संग’ या पुस्तकातून लौकिकाला अलौकिक करणार्‍या ध्यासवेड्यांची व्यक्तिचित्रणे रेखाटली आहेत. या व्यक्तिचित्रणांच्या माध्यमातून सामाजिक परिवर्तनाची दिशा स्पष्ट करण्याचा हा पहिलाच प्रयत्न असावा. साहित्यिक भाषेत संघ कार्यकर्त्याचा परिचय करून देणारे हे पहिलेच पुस्तक असेल.

पुस्तकाची किंमत ३००/- रुपये असली तरी यातील ५०/- रुपये गिरीश प्रभुणे यांचे जीवनकार्य असणाऱ्या ‘पुनरुत्थान समरसता गुरुकुलम’ संस्थेला देणगी रूपाने दिले जातील.

300.00
Sale!

“शहरी माओवाद – आव्हान संवैधानिक लोकशाहीला”

हा विषय केवळ अभ्यासकांपुरता मर्यादित न राहता मोठ्या प्रमाणात सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवा यासाठी “शहरी माओवाद – आव्हान संवैधानिक लोकशाहीला” ही पुस्तिका प्रकाशित करीत आहोत.

50.00
Sale!

आत्मघातकी दहशतवाद (मानवी बॉम्ब)

राजकीय, धार्मिक, मानसिक, सामाजिक तसेच आर्थिक ह्या सगळ्या पैलूंचा अभ्यास करून हे पुस्तक लिहिलेलं आहे. आत्मघातकी दहशतवादी (मानवी बॉम्ब) कसा बनवला जातो ? ब्रेनवॉश कसे करतात ? धर्माचा वापर कसा करतात ? दहशतवादी संघटना स्त्रियांचा आणि मुलांचा गैरवापर कसा करतात ? ऑनलाईन रिक्रुट करणे, दहशतवादी साहित्य, व्हिडीओ अशा अनेक पैलुंवर ह्या पुस्तकात अभ्यासपूर्ण विवेचन आहे.
लेखिका – रूपाली भुसारी

285.00
Sale!

कर्तव्यभूमीचे पुजारी ( पाच पुस्तकांचा संच )

कर्तव्यभूमीचे पुजारी ( पाच पुस्तकांचा संच )
फक्त २५०/- रुपयांत 
* मा. रवींद्र पवार, कोकण प्रांत – अभाविपचे कार्यकर्ता ते कोकण प्रांत सहकार्यवाह अशा चढत्या भाजणीमध्ये जबाबदारी घेऊन संघकामाचा सामाजिक आशय प्रकट करणारे कार्यकर्ते म्हणजे रवींद्र तुकाराम पवार होय.
* मा. मोहनराव गवंडी, प. महाराष्ट्र प्रांत – भारतीय मजदूर संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते. विधान परिषदेचे आमदार. सामाजिक समरसता मंचाचे संस्थापक म्हणून मोहनराव गवंडी यांनी दीर्घकाळ काम केले आहे.
* गोविंदराव (नाना) आहेर, प. महाराष्ट्र प्रांत – नाशिक जिल्ह्यातील ग्रमीण भागात संघकामाची व्याप्ती वाढवून स्वयंसेवकांना कायम आपुलकी, प्रेमाची अनुभूती देणारे जिल्हा संघचालक म्हणून गोविंदराव (नाना) आहेर यांनी काम केले.
* भाऊसाहेब जहागीरदार, देवगिरी प्रांत – ज्येष्ठ संघकार्यकर्ते. विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून हिंदुत्त्वाचा विषय सर्वदूर घेऊन जाणारे कार्यकर्ते म्हणजे भाऊसाहेब जहागीरदार होय.
* बापूसाहेब लाखणीकर, विदर्भ प्रांत – विदर्भातील पहिल्या पिढीचे संघ स्वयंसेवक. शिक्षण क्षेत्रात संस्थात्मक बांधणी करुन राष्ट्रीय विचारांची जपवणूक करणारे कार्यकर्ते म्हणजे बापूसाहेब लाखणीकर होय.

250.00
Sale!

खेचर ते एडिटर

जगावेगळे शीर्षक असलेले पुस्तक लवकरच आपल्या भेटीला येत आहे.

आयुष्यातील छोट्या छोट्या गोष्टींमधून जीवनाकडे बघण्याचा डोळस दृष्टिकोन या पुस्तकातून वाचकाला अनुभवायला मिळेल.

225.00
Sale!

गप्पा निसर्गाच्या

बदलते हवामान, बांबू लागवड, जंगल कायदा, गवताळ प्रदेश, गावरान बीजसंवर्धन, गोव्यातील जंगले आणि खाण प्रश्न, पर्यावरणस्नेही कापडनिर्मिती आणि घरबांधणी.

पर्यावरणाशी निगडित 25 तज्ज्ञ आणि अनुभवी व्यक्तींच्या मुलाखतींचा संग्रह.

225.00