अमृताचा अथांग सागर : श्री.प.प. श्रीवासुदेवानंद सरस्वती टेंब्ये स्वामी महाराज

टेंब्ये स्वामी महाराजांचे कधीही वाचनात न आलेले चरित्र. स्वामी महाराजांनी या ग्रंथांमधून जे तत्त्वज्ञान मांडले आहे, ते अमृतासमान आहे. त्यांच्या वाङ्मयनिर्मितीविषयी, त्यांच्या विचारांविषयी सर्वसामान्यांच्या मनात उत्सुकता, ओढ निर्माण करणे हे या ग्रंथाचे मुख्य उद्दिष्ट.

450.00
Sale!

आपले मौलिक संविधान

संविधानाची मौलिकता कशात आहे, आपले संविधान आणि इतर देशांचे संविधान यात काय फरक आहे हे समजावून सांगणारे पुस्तक.

200.00

आपल्या अस्मितेचा संघर्ष : श्रीराममंदिर

राम मंदिरासंदर्भातल्या अनेक शंकांचे, अनेक प्रश्नांचे समाधान करणारी पुस्तिका. 1990 पासून सुरू झालेला हा मंदिरयज्ञ आता थांबला आहे. या यज्ञात अनेकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली आहेत. त्या सर्वांचे स्मरण करून भव्य मंदिर उभारण्याने या अस्मितायज्ञाची सांगता करायची आहे. त्याचा इतिहास, संघर्ष आणि भावी काळातील करायची कामे याची माहिती घेणारी ही पुस्तिका आहे.

50.00
Sale!

आम्ही आणि आमचे संविधान

भारतीय संविधान नेमके आहे तरी काय? ते कसे निर्माण झाले? संविधानाने आपल्याला काय दिले? या प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी वाचलेच पाहिजे असे मराठीतील साध्या आणि सोप्या भाषेतील पुस्तक. प्रत्येक भारतीय नागरिकाने वाचावे असे पुस्तक.

135.00

आव्हान : रक्तरंजित माओवादाचे

शहरी माओवाद कसा फैलावला? या माओवाद्यांचे खरे साथीदार कोण? याचे अभ्यासपूर्ण विवेचन करणारे पुस्तक. देशहिताला काडी लावत आपली दिशाभूल आणि फसवणूक करणारे विद्वान, राजकारणी आणि पत्रकार आपल्या आजूबाजूलाच वावरत आहेत, पण आपण त्यांना ओळखू शकत नाही. ते ओळखण्याची आज वेळ आली आहे. ते कसे ओळखावे यासाठी वाचलेच पाहिजे असे पुस्तक.

140.00
Sale!

कुरूपतेला सुंदरता देणारा : महामानव अब्राहम लिंकन

अमेरिका अखंड ठेवण्याबरोबरच निग्रोंना गुलामीतून मुक्त करण्याचे महान कार्य करणाऱ्या अब्राहम लिंकनविषयी. राष्ट्र, राष्ट्रीयता, राष्ट्रीय ऐक्य, प्रजेचे भावनिक ऐक्य, राजपुरुषाचे चरित्र या सर्व दृष्टीने अब्राहम लिंकन हा निरंतर अभ्यासाचा विषय आहे.

202.50
Sale!

गांधी समजून घेताना

गांधीजींची जडणघडण कशी झाली, महात्मा गांधींच्या चिंतनावर भगवद्गीता आणि उपनिषदे यांचा कसा प्रभाव होता आणि गांधीजींची हत्या या तीन भागांवर या पुस्तकांतून प्रकाश टाकण्यात आला आहे.

100.00
Sale!

परीसवेध

सामान्यातून असामान्य कर्तृत्व घडविणाऱ्या संघस्वयंसेवकांची अक्षरगाथा.अत्यंत साध्या, सोप्या व नेमक्या आणि हृदयस्पर्शी शैलीमध्ये शब्दांकित केलेले, अशा अनेक संघस्वयंसेवकांच्या संक्षिप्त शब्दचित्रांचे हे संकलन आहे. संघकार्य आणि संघ समजू इच्छिणाऱ्यांसाठी हा अनमोल दस्तावेज आहे.

300.00